छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई: नक्षल कमांडर भास्कर एन्काऊंटरमध्ये ठार, सुरक्षा दलांचे मोठे यश

126

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेदरम्यान, तेलंगणा राज्य समिती सदस्य व नक्षल कमांडर भास्कर उर्फ मैलारापू अडेल्लू (४५) याला ठार करण्यात आले. भास्करवर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो नक्षलवादी संघटनेच्या धोरणात्मक कारवायांमध्ये सक्रिय होता.

या तीन दिवसांच्या मोहिमेत एकूण सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, ज्यामध्ये केंद्रीय समिती सदस्य सुधाकर उर्फ गौतम याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एके-४७, इन्सास रायफल्स, देशी बनावटीचे पिस्तूल, ग्रेनेड, वायरलेस सेट आणि इतर नक्षल साहित्य जप्त केले आहे.