माऊंट लीटरा झी स्कूलचा उद्घाटन सोहळा संपन्न

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.10जून):-शहरातील परभणी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपाच्या समोर नव्यानेच स्थापन झालेल्या ईशा भगवती फाउंडेशन संचलित झी लर्नचे माऊंट लिटरा झी स्कूलचा भव्य शुभारंभ सोहळा (दिनांक 8 जून रविवार) रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला 

शाळेचे उद्घाटन विठ्ठलराव गुणाजी देवसरकर, अविनाशराव बालासाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमास खा.संजय जाधव,मा.आ.डॉ.मधुसूदन केंद्रे,प्रेरणाताई वरपूडकर,आ.अमरनाथ राजूरकर,आ.किसनराव वानखेडे,तातूभाऊ देशमुख,उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, मनीष शर्मा, सभ्यासाची चटर्जी, शाळेचे संचालक डॉ.अंकुश देवसरकर,क्षितिज चौधरी,डॉ.सौ.शुभांगी देवसरकर,सौ.मयुरी चौधरी,अकॅडमिक डायरेक्टर भीमप्रतापसिंह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डोरेमोन,बालगणेश कार्टून आर्टिस्ट मेघना एरंडे जोशी, मुंबई येथील अँकर दिव्या राठोड या कलाकारांची उपस्थिती होती.याप्रसंगी मेघना एरंडे जोशी यांनी कार्टूनची आवाज काढत लहान चिमुकल्यांचे मनोरंजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही विविध गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक क्षितिज चौधरी यांनी केले तर आभार संचालक डॉ.अंकुश देवसरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गंगाखेड शहर व तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांसह मोठी उपस्थित दर्शवली होती.