रोप्य महोत्सवी समाधी सोहळ्यानिमित्त सद्गुरु महिमा

52

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)

गंगाखेड येथे श्री समर्थ सद्गुरु काशिनाथ महाराज तीर्थक्षेत्र धाम गंगाखेड येथे रोप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सद्गुरु महिमा कथेचे आयोजन करण्यात आले आहे

सद्गुरु काशिनाथ महाराज गंगाखेडकर यांना समाधी घेऊन 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिनांक 16 ते 23 जून2025 पर्यंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर माता कनकेश्वरी देवी यांच्या अमृतवाणीतून सद्गुरु महिमा यावर प्रवचन देणार आहेत 16 जून पासून 23 जून2025 पर्यंत दररोज सकाळी दहा वाजता प्रवचना सुरुवात होणार असून दुपारी एक वाजता दैनंदिन कथा सांगता होईल त्यानंतर दररोज भोजन प्रसादाचे आयोजन दत्त मंदिर येथे करण्यात आले आहे येथील सद्गुरु परिवार गंगाखेड यांनी मागील २५ वर्षात महामंडलेश्वर माता कनकेश्वरी देवीच्या 31 कथेचे आयोजन केले होते काही कथा भारतातील विविधतेचा क्षेत्रावर संपन्न झाल्या यात ऋषिकेश ,वाराणसी, जगन्नाथ पुरी, द्वारका धाम याचा समावेश आहे 28 जुलै 2025रोजी श्रावण मासानिमित्त शिव महापुराण कथेचे श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे तर 25 ऑक्टोबर2025 पासून आयोध्या येथे श्रीराम कथेचेही सद्गुरु परिवार गंगाखेड यांनी आयोजन केले आहे

श्री श्री महामंडलेश्वर माता कनकेश्वरी देवी यांच्या भारतातील विविध धार्मिक स्थळावर आजपर्यंत 650 रामकथा ,भागवत ,शिवपुराण अशा विविध कथा पूर्ण केल्याआहेत

संतांमध्ये महामंडलेश्वर पद प्राप्त करणाऱ्या मा कनकेश्वरी देवी या भारतातील एकमेव महिला संत आहेत सात दिवस चालणाऱ्या कथेचा लाभ घ्यावा

दिनांक 23 जून रोजी कथेची सांगता होणार असून सद्गुरु काशिनाथ महाराज यांच्या समाधी स्थळावर दुपारी बारा वाजता गुलाल अर्पण करण्यात येऊन महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य यजमान सौ शारदा प्रभाकर देशमुख , सद्गुरु काशिनाथ महाराज संस्थान व सद्गुरु परिवार गंगाखेड यांनी दिली आहे