महात्मा फुले हायस्कूल येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा !

171

▪️विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक, दफ्तर व गणवेश वाटप !…

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगांव(दि.16जून):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले.

          शाळा प्रवेशोत्सव – २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक, दफ्तर वाटप करण्यात आले. नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांच्या हस्ते करण्यात आले.

          शाळेच्या पहिल्या दिवशी सालाबादाप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दिनेशशेठ लोहार यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कांदापोहे व गुळाची जिलेबीचा अल्पोहार देण्यात आला. मुलांचा पहिला दिवस आनंददायी झाला.

            याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार , ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे, एम बी मोरे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, ग्रंथपाल गोपाल महाजन, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, अशोक पाटील, जीवन भोई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार पी डी पाटील यांनी मानले.