✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)
गंगाखेड(दि.21जून):- शहरातील गीता मंडळ येथे दिनांक 21 जून रोजी सरस्वती विद्यालयाचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पतंजली योगपीठ प्रशिक्षित योग शिक्षिका अभिलाषा गोपाल मंत्री यांनी आयुष्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सर्व आसन, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके दाखविली व त्यामुळे मिळणारे लाभ याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले . यावर्षीची योग दिनाची थीम
‘एक पृथ्वी एक आरोग्य ‘ यासंबंधी सुद्धा विद्यार्थ्यांना विशेष माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली, योग व आयुर्वेद याचे मानवी जीवनातील महत्त्व , योग्य आहार व निरोगी जीवनशैली याविषयी माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षक गोपाळ मंत्री यांनी केले . यावेळी साडेतीन वर्षाची चिमुकली कु. ओजस्वी मंत्री हिने सुद्धा काही आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, उपमुख्याध्यापिका छाया घोळवे, मकरंद चीनके, अनंत काळे, चंद्रकांत आलापुरे, सुरेश लव्हाळे, अविनाश घोगरे, सारिका संगेवार, गोदावरी मुधोळकर, भुवनेश्वरी निळकंठ, रोहिणी मस्के आदी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.



