आजचे नवागत उद्याचे भविष्य. ..सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल

39

✒️कुरखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुरखेडा(दि.24जून):- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त तसेच लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या येरकडी तसेच लवारी येतील जि.प.प्रा. शाळेत जाऊन विद्यार्थांची भेट घेतली त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला, अंगी असलेल्या कलागुणांच्या माध्यमातून माणूस येशाचा शिखर गाठू शकतो त्यासाठी अंगी असलेल्या कलागुणांना महत्व देणे गरजेचे आहे. तुम्ही आजचे नवागत उद्याचे भविष्य आहात. माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं असे मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ ,नोटबुक तसेच शालेय साहित्य देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबतच दोन्ही शाळेला भेटवस्तू म्हणून काही पुस्तके सुद्धा भेट दिली.

दोन्ही शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच येरकडी येतील जि.प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक वसंत कुळमेथे बोलताना म्हणाले की, दुर्गम भागातील मुलगी आज वाचनाच्या माध्यमातून साहित्यिक बनली तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे ही अभिमानाची बाब आहे. आमच्या शाळेला भेट देणाऱ्या साहित्य तसेच सामाजिक क्षेत्रातील ह्या पहिल्याच व्यक्तीमत्व आहेत अशा मोलाच्या उपक्रमातून व संवादातून विद्यार्थांना प्रेरणा मिळते. म्हणून त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी येरकडी शाळेतील शिक्षक रतिराम पुडो यांनी सुद्धा संगीता ठलाल यांचा विद्यार्थांना परीचय करून दिला तसेच शाळेला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.सोबतच जि.प.प्रा.शाळा लवारी येतील मुख्याध्यापक नैना कानकंट्टीवार यांनी सुद्धा संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शाळेला भेट दिली आणि विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले म्हणून आभार मानले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.