मुन्नाभाई वाठोरे यांना युवा रत्न पुरस्काराने सन्मानित

162

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.28जून):- सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या युवकांना भास्कर व्यायाम शाळा, क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिल्या जातो.

यावर्षीचा युवारत्न पुरस्कार नांदेड येथे दि. २३ जून रोजी आंबेडकर मिशन सेंटरचे संचालक दीपक कदम यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला.

आयोजक किरण सदावर्ते आणि यांच्या हस्ते उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते भीम टायगर सेना मराठवाडा महासचिव मुन्नाभाई वाठोरे यांची समजाप्रति असलेली तळमळ त्याचे योगदान पाहून यावर्षीचा युवा रत्न पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह सोबत प्रशस्तिप्रत होते.

यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.