

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.1जुलै):-उच्च प्राथमिक शाळा कोलार येथील मुख्याध्यापिका सौ .आशा भीमराव दुमोरे या नियत वयोमानानुसार 30 जून 2025 ला सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ दिनांक १ जुलै 2025 ला घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. मीनाताई तायवाडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे सौ. दुर्गा ताई भोयर सरपंच गट ग्रामपंचायत कोलार, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मा. नारायण चापले , केंद्रप्रमुख मा. रामकृष्ण ढोले , केंद्र मुख्याध्यापक मा. मोहन जुमडे , सौ ठाकरे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. सत्कारमूर्ती सौ.आशा दुमोरे यांच्या कार्यावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती आशा दुमोरे यांच्या सत्कारामध्ये शाल , पुष्पगुच्छ,रोपटे आणि संदीप गायकवाड लिखित शोषित मुक्तीच्या: लढाया भ्रम आणि वास्तव हे पुस्तक भेट देण्यात आले.तसेच गट ग्रामपंचायत कोलार तर्फे संविधान ग्रंथ, शाल व विद्याचे झाड भेट देण्यात आले.
यावेळी संदीप गायकवाड यांनी आशा दुमोरे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सौ दुर्गाताई भोयर सरपंच यांनी दुमोरे मॅडमच्या जीवनाविषयी आपले मत व्यक्त केले. शिक्षण विस्तार अधिकारी नारायण चापले यांनी दुमोरे मॅडम यांनी केलेल्या सेवेचे महत्त्व सांगितले. तसेच भीमराव दुमोरे सर यांनी सुद्धा दुमोरे मॅडमच्या कार्याविषयी माहिती दिली. केंद्र मुख्याध्यापक मोहन जुमडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .केंद्र प्रमुख यांनी आपल्या भाषणातून दुमोरे मॅडमच्या स्वभावाचे महत्त्व सांगितले.
सत्कारमूर्ती आशा दुमोरे यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वनिता ढाबरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनिता हिंगे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन ताराबाई पाटील यांनी मानले .या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.



