

✒️पुणे प्रतिनिधी(जगदीप वनशिव)
पुणे – ज्ञानाई फाऊंडेशन कला साहित्य विचारमंच च्या वतीने ज्ञानाई कला काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . ” आनंदाचे क्षण सारे “या कार्यक्रमात मराठी कविता, हिंदी मराठी गाणी आणि गझल यांचे बहरदार सादरीकरण करण्यात आले .महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार मसूदभाई पटेल, ग्रामीण गीतकार चंद्रकांत जोगदंड, गायकवाडीचे कवी गायक आनंद गायकवाड, दर्दभरी आवाजाचे सुप्रसिद्ध गायक छगन वाघचौरे, करावोके गायक ख्वाजाभाई, डॉ .चारूदत नरके, कजरी दिवाळी अंकाच्या संपादिका श्रीमती अलका ताई भुजबळ, सौ विजयाताई नरके, चैताली भुजबळ रागिनी कुदळे ,श्री व सौ बंदुके, आहिर मॅडम श्रीकांत कुदळे महाराष्ट्राचे रानकवी सुप्रसिद्ध निवेदक जगदीप वनशिव आणि ज्ञानाई फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष सीताराम नरके उपस्थित होते .
त्वचारोग तज्ञ डॉ चारुदत्त नरके यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी मराठी गाणी नृत्य व काव्य मैफिल रंगतदार झाली जगावेगळ्या व्यक्ती येवून मला शुभ आशीर्वाद दिले मी व माझा परिवार आनंदाच्या डोहात न्हाऊन निघाले असून माझ्या आयुष्याच्या स्मरणात राहील असे म्हटले उत्सव मूर्ती डॉ चारुदत्त नरके
पुणे येथील ज्ञानाई फाऊंडेशनच्या नरके पॅलेस येथे कला काव्य महोत्सव साजरा करण्यात आला



