समता सोसायटी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 

89

▪️शिक्षण समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – आ. सुधाकर अडबाले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जुलै):-आजच्या जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांनी निराश न होता विविध स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणे अत्यावश्यक आहे. तसेच ज्यांना व्यवसाय क्षेत्रात रूची आहे अशांनी व्यवसाय कौशल्यावर विशेष भर देणे गरजेचे असल्याचे मत शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांनी येथे केले. समता सोसायटी फॉर एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट द्वारा श्रमिक पत्रकार भवनात गुणवंत विद्यार्थी, यशस्वी पालक तथा माजी यशस्वी प्रशिक्षणार्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून आ. अडबाले बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.

बल्लारपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजरत्न वानखेडे, वणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुंबडे, सत्कारमूर्ती नामदेव गेडकर , श्रीमती श्यामलता गेडकर , श्रीमती तेलतुंबडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात एन. एन. गेडकर यांनी संकलित केलेल्या बुद्ध भीम गीतसंग्रह प्रकाशन करण्यात आले . चंद्रपूर शास.औ.प्र.संस्थेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल एन. एन. गेडकर यांचा सपत्नीक सत्कार आ. अडबाले यांच्या हस्ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आला.

     माणुसकीला वृध्दींगत करणारी बुद्ध भीम तत्वज्ञान आधारित गीतांचे संकलनाचे पुस्तक प्रकाशन, गुणवंतांचा- यशस्वी पालकांचा गौरव समारंभ प्रेरणादायी असल्याचे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले.

     यावेळी प्राचार्य वानखेडे व प्राचार्य तेलतुंबडे यांनीही गेडकर यांच्या जीवनकार्यावर समायोजित प्रकाश टाकला. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. राजेंद्र जेनेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, जाणिव विचारपीठ, झाडी बोली साहित्य मंडळ, अभिजात सार्वजनिक वाचनालय , मिलेनियम गृप, पद्मराज जिएफ आर चॅप्टर आदी संस्थानी केले होते. कार्यक्रमास त्रीरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी रत्ननायक ,ताराकेतु,धम्ममित्र दिलीप पारवे ,समाज बांधव ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.