राष्ट्रीय हरित सेना विभाग वार्षिक सार्वत्रिक निवडणुक संपन्न

210

▪️विद्यार्थीनी प्रतिनिधी प्राप्ती पावडे तर विध्यार्थी प्रतिनिधी हिमांशू येवले यांची बहुमताने निवड

▪️विद्यार्थांनी जाणुन घेतली प्रत्यक्ष निवडणूक मतदान प्रक्रियेची माहिती

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.१०जुलै):- आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थी प्रतिनिधी पदाची वार्षिक सार्वत्रिक निवडणुक पार पडली. सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र राजुरा अंतर्गत राष्ट्रिय हरीत सेना विभाग वर्षभर विवीध पर्यावरणपूरक जनजागृती उपक्रम ,कार्यक्रम राबवितात. लोकशाही पद्धतीने होणारी सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया हि बालवयात विद्यार्थांना कळावी त्याचे प्रात्यक्षिक अनुभवता यावे याकरिता इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची निवडणुक मतदान प्रक्रिया राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

विशेष म्हणजे सर्व शिक्षकांनीही या प्रक्रियेत सहभागी होत मतदान केले. एकुण ७७ विध्यार्थी व १५ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थीनी प्रतिनिधी पदाकरीता उभे असलेल्या विद्यार्थीनीचे बोधचिन्ह गुलाब, शेवंती, मोगरा, जास्वंद, झेंडू असे होते तर विध्यार्थी प्रतिनिधी उमेदवारांना वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब असे चिन्ह देण्यांत आले होते. अत्यंत पर्यावरणपूरक वातावरणात ही निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मतदान अधिकारी म्हणून विद्यार्थीनी अनुष्का वांढरे, मानसी बोबडे ,निकिता वानखेडे यांनी जबाबदारी पार पाडली.

१०७ पैकी ९२ मते वैध तर १४ मते अवैध ठरली. प्राप्ती पावडे ला ६० मते, हिमांशू येवले ला ५९ मते घेतं बहुमताने विजयी झाले. वर्षभरातील राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रम कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करून शासनाच्या निर्देशानुसार विवीध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येते.