राजुरा तालुक्यातील ६५ पैकी बिगर अनुसूचित क्षेत्रातील ३३ ग्रा.पं.चे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

73

✒️बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428 

  राजुरा(दि.12जुलै):-तालुक्यातील सन २०२५-२०३० मध्ये होणाऱ्या व या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे चक्रानुक्रम व सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. राजुरा तालुक्यात एकूण 65 ग्रामपंचायती असून त्यापैकी बिगर अनुसूचित क्षेत्रातील 33 ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आदेशानुसार सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती स्त्री सरपंच पदाकरिता राखीव ग्रामपंचायती खामोना, पंचाळा, कोहपरा ,कळमना या आहेत.

अनुसूचित जाती सर्वसाधारण चिंचोली खुर्द, कोलगाव, धिडशी, अनुसूचित जमाती स्त्री सरपंच पदाकरिता राखीव ग्रामपंचायती चंदनवाही ,सास्ती. अनुसूचित जमाती सर्वसाधारण सातरी, वरोडा. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री बामनवाडा, नलफडी, पवनी, विहीरगावं, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण चुनाळा, गोवरी, कविठपेठ, चनाखा, धोपटाळा, सर्वसाधारण स्त्री सरपंच पदाकरिता राखीव ग्रामपंचायती रामपुर, धानोरा, चार्ली, चिंचोली बुज, कढोली बूज, मारडा, सर्वसाधारण सरपंच पदाकरिता आर्वी, मूर्ती, सुमठाना, साखरवाही, पेल्लोरा, मुठरा, सिंधी. अनुसूचित जमाती स्त्री सरपंच पदाकरीता राखीव ग्रामपंचायती मंगी बू., वरुर् रोड, सोनुर्ली, सोंडो, विरूर् स्टेशन, भेंडाळा, अंतरगावं (अन्नुर), पाचगावं, देवाडा, भूर्कुंडा बु., जामणी, सोनापुर, भेंडवी, अहेरी, गोयेगाव, टेंभूरवाही, अनुसूचित जमाती सर्वसाधारण सरपंच पदासाठी राखीव ग्रामपंचायती पांढरपौंनी, हरदोना खु., भेदोडा, लक्कडकोट, कोष्टाळा, डोंगरगावं, सुबई, येरगव्हान, भूर्कुंदा खू., इसापूर, मानोली खुर्द, नोकारी खुर्द, साखरी, सिर्सी, मानोली बूज, कावडगोंदी अशाप्रकारे आरक्षण जाहीर झाल्याची माहिती राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय असणारी ग्राम पंचायत आपल्या ताब्यात असावी याचा प्रयत्न छोटे मोठे सर्वच पक्ष करीत आहेत. त्याकरिता मोर्चेबांधणी सुरू झाली असून आरक्षणामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद व दुःख बघायला मिळत आहे. तर ग्रामीण भागातील नव नेतृत्वाला पुढे येण्याची संधी मिळाली आहे.