

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.12जुलै):- तालुक्यातील पिंपळगाव भोसले गावालगत वैनगंगा उपनदी वाहते. नदीला लागून अनेक शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची शेत जमीन आहे.
सन 2019 मध्ये गोसीखुर्द धरणातून वारंवार पाणी सोडल्याने शेतीच्या दिशेने नदीतील पाण्याचा प्रवाह वाहून 2019 पासून कमीत कमी 50 ते 60 एकर जमीन नदीपात्रामध्ये गेली आहे. त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांच्या विहिरी नदीपात्रामध्ये गेले. यावर्षी सुद्धा सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्याने शरद वामन शेबे यांच्या स्वमालिकीची 2 हेक्टर अधिक शेतजमीन नदीपात्रामध्ये गेली. शेतकरी अपंग असून अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला या क्षेत्रातील आमदार यांच्याकडे मागणी केली परंतु कोणतीही मोका चौकशी न होता.
त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही सातबारा असून जमीन नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झाली याच वर्षी दोन विहिरी नदीपात्रामध्ये गेले संबंधित तलाठी ब्रह्मपुरी येथील संबंधित तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले परंतु कोणतीही मोका चौकशी केली नाही व त्यांना मोबदला मिळाला नाही.
आमच्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना विहिरीचा व पिका सहित जमीन नदीपात्रामध्ये गेली त्यांचा मोबदला देण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालय यांच्यासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.



