

✒️बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.12जुलै):-महाराष्ट्र – तेलंगणा राज्य सीमेलगत असलेल्या सोनुर्ली गावालगतच्या शेत शिवारात सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू झाल्याची माहिती असून यात परवानगीच्या अटीशर्ती धाब्यावर बसविल्या जात आहे असे समजते.
या क्लब मध्ये लगतच्या राज्यातील परप्रांतीय खेळायला येत असल्याने शेत शिवारात काम करणाऱ्या महिलांमध्ये मोठा रोष पहायला मिळत आहे. दररोज 10- 15 चारचाकी वाहनातून परप्रांतीय मंडळी येत असल्याने शिवारात तोबा गर्दी दिसून येत आहे. मुळात क्लब ला परवानगी देताना अटी व शर्ती लादून दिल्या जाते. रात्री 10 वाजेपर्यंतच क्लब सुरू ठेवता येतो. परवानगीत दिलेल्या ठराविक टेबल वर पत्ते खेळायची मुभा आहे. मात्र या नियमांला पाय दडी तुडवीत क्लब रात्रभर सुरू राहत असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने महिला शेतात कामासाठी जात आहे. मात्र शेत शिवारात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात राहत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने क्लब बाबत चौकशी करून याची शहानिशा करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. क्लब नियमानुसार असेल तरीही इतर ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे.



