“त्या” गोवंशीय जनावरे तस्करीला अभय कुणाचे?-जिवती तालुक्यातून होते तस्करी

87

✒️बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428 

राजुरा(दि.12जुलै):- महाराष्ट्रातून खरेदी करून गोवंशीय जनावरांची जिवती तालुक्यातील टेकामांडवा,भाईपठार मार्गे तेलंगणात बर्याच दिवसापासून तस्करी सुरु आहे, पाटण, टेकामांडवा, पिटीगुडा या पोलीस स्टेशन च्या हद्दीतून ही जनावरांची तस्करी सुरू आहे. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकानी ओरड केली, वर्तमानपत्रात बातमी आली परंतु ही तस्करी बंद झाली नाही.

 दरम्यान नुकतेच टेकामांडवा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली मार्गे तेलंगणात गोवंशीय जनावरांची तस्करी होत असल्याचे गोपनीय माहितीवरून चंद्रपूर येथील पोलीस पथकांनी पाळत ठेवून 17 पिकअप नी वाहतूक करणारे जनावरे जप्त करीत आरोपीना अटक केली. जिल्ह्यातील मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जाते.

     या मार्गाने बऱ्याच दिवसापासून गोवंशीय जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांना मिळते आणि कारवाई केली जाते तर मग टेकामांडवा पोलीस स्टेशन नक्षल प्रभावित सतर्क असणारे पोलिसांना याची माहिती नाही का? किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हे मात्र चर्चेचा विषय असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी गोरक्षक संघटनेनी केली आहे.