

✒️बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१६जुलै):- दिपस्तंभ बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा चे कोषाध्यक्ष सुरज रविंद्र खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त “एक पेड मां के नाम” या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थापक रविंद्र खैरे, सचिव किरण खैरे, अशोक दुबे, मुख्याध्यापिका रश्मी साहु , प्रणाली सातपुते,स्वाती कवठे,रक्षा सपाट, धनश्री इटनकर, अर्चना पाचभाई, सुचिता गड्डम,रजनी बारसिंगे,श्रिलेखा पुलिपाका,लक्ष्मी अंदगुल्ला,छाया हरीहर तसेच शालेय कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक विद्यार्थांच्या हस्ते एक झाड शालेय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडं लावण्याचे महत्व संस्थाअध्यक्ष रविंद्र खैरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता गड्डम , प्रास्ताविक रश्मी साहु व आभार प्रणाली सातपुते यांनी मानले.



