

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.16जुलै):- ब्रम्हपुरी शहर शिक्षणाचे माहेर घर आहे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.ब्रम्हपुरी परिसरात नेवजाबाई हितकारिणी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.या दोन्ही महाविद्यालयासाठी जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.सध्या पावसाळा सुरू आहे पावसाचे पाणी गड्ड्यात साचल्यानंतर तिथे गड्डा आहे किंवा नाही हे समजत नाही अशा परिस्थितीत मोटारसायकल,सायकल ने जाणारे विद्यार्थ्यांना जाताना तारेवरची कसरत करावी लागते तसेच याच मार्गाने तालुक्यातील अनेक गावाचे नागरिक सुद्धा जाणे येणे करतात याच परिसरात आठवडी बाजार भरत असल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांची मोठी गर्दी असते या रस्त्यावर गड्डे असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. याच रस्त्यावर गड्ड्यामुळे अपघात होऊन एका विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला. त्यानंतर प्रशासनाने थातूरमातूर डागडूगी केली .
पावसाळ्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक ते पोलिस वसाहत पर्यंत रस्त्याला मोठ मोठे गड्डे पडल्यामुळे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्या रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.सदर रस्ता दुरुस्त न केल्यास पुन्हा कोणाचा ना कोणाचा तरी अपघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रिपब्लिकन पक्ष खोरीपा च्या वतीने रस्ता दुरुस्त करण्याची मांग केली आहे . या जनहिताच्या मागणीचा योग्य विचार करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश सबंधित विभागाला देण्याचे करावे या मागणी करिता प्रशांत डांगे शहर अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष खोरीपा यांनी केली आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.



