जि.प. अन्नूर शाळेतील दोन विद्यार्थी शिषवृत्ती परिक्षेत पात्र

82

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.१६जुलै):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे,अंतर्गत पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षाचा निकाल लागला असुन जिल्हा परिषद शाळा अन्नूर शाळेने नेहमी गुणवत्ता पुर्ण काम केल्यामुळे येथील वर्ग ५ वीत दोन विद्यार्थी होते या वर्षी दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असुन विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक झाले आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगाना महाराष्ट्र राज्य सीमेवर राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्ग मागासलेला भाग म्हणून अन्नूर हे शेवटचे गाव म्हणून ओळखले जातात अन्नूर या गावाला लागून अगदी एक किलोमीटर अंतरावर तेलंगाना राज्याची सीमा असल्यामुळे या गावात ९५ टक्के समाज आदिवासी म्हणून वास्तव्याला आहे.

त्यामुळे मराठी व तेलगू भाषेचा समांतर असते या जिल्हा परिषद शाळेत वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत एकूण २४ विद्यार्थी आहेत यानां शिकवणी साठी दोन शिक्षक असून त्यातून वर्ग पाचवीत दोन विद्यार्थी होते. मुख्याध्यापक सुनिल बोढे,सहाय्यक शिक्षक संदीप तायडे यांच्या अथक परिक्रमातून रंजन ईश्वर नगारे ६८ टक्के, तर सृष्टी जगदीश सिडाम ६८. ६६ मिळाले असुन हे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले होते.

यावेळी सरपंच भास्कर कन्नाके,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुनिल बोढे,सहाय्यक शिक्षक संदीप तायडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश वेट्टी, अंगणवाडी सेविका दिक्षा चौधरी , पोलीस पाटील शीतल शेळमाके व गावातील पालकांनी,व इतर नागरिकांनीसत्कार करुन सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.