

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378
नागभीड(दि.16जुलै):- गाव खेडयातील गुणवंत जे निखळ मेहनत घेऊन विपरीत परिस्थितीत कौतुकास्पद शैक्षणिक वाटचाल करतात मात्र शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडण्याचे सौभाग्य विरळच. मात्र ईश्वर-सखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ गत ७ वर्षापासून मिंथूर येथील समाज मंदिरात आयोजीत गाव खेडयातील गुणवंत विदयार्थी गौरव सोहळा हृदयस्पर्शी ठरला. उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ चव्हाण परिवारांतर्फे मिंतूर आणि नवेगाव या खेडेगावातील वर्ग दहावी आणि वर्ग बारावी प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 12 जुलै 2025 रोजी संपन्न झाला. शालेय वस्तू, सन्मान चिन्ह, समान पत्र व रोख रक्कम देऊन त्यांचा गुणवंताचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप गेडाम सहसंचालक (आरोग्य विभाग) हे होते तर गुणवंताना भविष्याची दिशादर्शन करण्याकरीता विनोद छगनलाल भैया मुख्याध्यापक ने . ही. हायस्कूल नवेगाव पांडव, प्रा. महेश पानसे राज्य उपाध्यक्ष राज्य पत्रकार संघ, अरुणजी चव्हाण सेवानिवृत्त शिक्षक बाळापुर , ऍड. शर्मिलाताई रामटेके माजी सरपंच नवेगाव पांडव हे होते. विशेष उपस्थिती सौ. विशाखा ताई डोंगरे सरपंच मिंथुर यांची होती.
सर्व मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करून यशाचा व प्र गतीचा कानमंत्र दिला. यावेळी गाव खेडयातील गुणवंताच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता भीमरावजी उंदीरवाडे चंद्रपूर, शांताताई गेडाम नागपूर, निखिल शेंडे ब्रह्मपुरी हे प्रामुख्याने उपस्थित झाले होते. दोन्ही गावातील गुणवंतांचे पालक आवॅजुन उपस्थित झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सौ. प्रियंका उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन प़मुख रतिराम चव्हाण यांनी तर सर्वांचे आभार अंगद अरुण चव्हाण यांनी मानले.
गत अनेक वर्षापासून चव्हाण परिवार गावातील व परिसराचे आपले देणे लागतो या भावनेतून गुणवंत विदयार्थ्यांचे पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी सदर हृदयस्पशीं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नवेगाव पांडव व मिंभूर येथील गावकरी, विदयार्थी या कौतुकाची उत्सुकतेने वाट बघतात हे विशेष.



