

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा (१८ जुलै ) येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार निर्माण करण्यात आलेल्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या तृतीय आणि चतुर्थ सत्राच्या अभ्यासक्रमाची संबंधित विषयाच्या प्राध्यापकाना माहिती व्हावी जेणेकरून त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल यासाठी इतिहास, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी आणि भूगोल या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या निर्देशानुसार आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) यांच्या सौजन्याने कार्यशाळा श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते पार पडले, या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून आ. शि. प्र. मं. राजुरा चे ज्येष्ठ संचालक तथा हिशोब तपासनीस दत्तात्रायजी येगीनवार, विशेष अतिथी म्हणून मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता मा. डॉ. श्याम खंडारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. डॉ संजय गोरे, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नंदाजी सातपुते, पाचही विषयाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेरानी, आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. वि. के. शंभरकर उपस्थित होते.
उद्घाटन सत्र संपल्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास, मराठी, भूगोल आणि हिंदी विषयाच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार बनविलेल्या बी. ए. द्वितीय वर्षाच्या तृतीय आणि चतुर्थ सत्राच्या अभ्यासक्रमावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ प्रकाश शेंडे, सदस्य डॉ पुरुषोत्तम माहुरे, सदस्य डॉ मिलिंद भगत, इतिहास विषयाचे विभागप्रमुख व चर्चासत्राचे समन्वयक प्रा. गुरुदास बल्की, राज्यशास्त्र अभ्यासमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ रवी धारपवार, सदस्य डॉ प्रमोद शंभरकर, राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख व चर्चासत्राचे समन्वयक डॉ राजेंद्र मुद्दमवार, मराठी अभ्यासमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ संजय लाटेलवार, सदस्य डॉ परमानंद बावणकुळे, मराठी विषयाचे विभागप्रमुख व चर्चासत्राचे समन्वयक डॉ संतोष देठे,
भूगोल अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ राजेंद्रकुमार डांगे, सदस्य डॉ योगेश दुधपचारे, भूगोल विषयाचे विभागप्रमुख व चर्चासत्राचे समन्वयक डॉ प्रमोद वसाके, हिंदी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ सुनीता बनसोड, सदस्य डॉ रवींद्रनाथ पाटील तसेच या पाचही विषयाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य आणि संबंधित विषयाचे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयाचे १५६ प्राध्यापक उपस्थित राहून झालेल्या चर्चासत्रात भाग घेतला. या कार्यशाळेचे संचालन प्रा. सुवर्णा नलगे यांनी तर आभार डॉ राजेंद्र मुद्दमवार यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.



