

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.24जुलै):-साकोली येथील श्याम हॉस्पिटलचे डॉ .देवेश अग्रवाल गेल्या 14 दिवसापासून फरार असून अजून पर्यंत ते सापडले नाही ,पोलिसांकडून पकडले गेले नाही त्यामुळे समाजामध्ये खूप मोठा असंतोष पसरलेला आहे .याबाबतीत विविध सामाजिक संघटनेने सुद्धा भेटी दिलेले आहे परंतु आज साकोली येथील पोलीस स्टेशनमध्ये तपास करत असलेले एडिशनल एस .पी .हनुमंत मोरे यांची महामाया महिला सामाजिक संघटनेच्या पदे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन डॉक्टरला केव्हा अटक होणार व त्यांच्यावर कठोर कारवाई कशी होणार या दृष्टिकोनातून विचारपूस करण्यात आली तर त्यांनी सांगितले की ,तपास चारही दिशेने सुरू असून पोलीस तुकड्या चारही बाजूला पोहोचलेल्या आहेत आणि आज नागपूर हायकोर्टातून त्यांनी जमानतचा जो अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अटक होणे स्वाभाविकच आहे. आम्हाला दोन दिवस द्या आम्ही त्यांची अटक नक्कीच होईल अटकच होणार नाही तर त्यांच्यावर चांगली कठोर कारवाई कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
सर्व नातेवाईकांची चौकशी सुरू असून त्यांचे बँक अकाउंट सुद्धा सील करण्यात आलेले आहेत .त्यांचे सर्व मोबाईल सुद्धा ट्रेस करण्यात आलेले आहेत .सर्व नातेवाईक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी नातेवाईकाचे सुद्धा कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस तपास अतिशय वेगाने सुरू असून योग्य ती कारवाई त्यांच्यावर होईल असे त्यांनी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले .
याप्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी .जी .रंगारी, महामाया महिला सामाजिक न्याय संघटने महिला अध्यक्षा शितल नागदेवे, देवका डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते भावेश कोटांगले , विजय नंदागवळी, बिट्टू गजभिये व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.



