

🔺या हायकोर्ट निर्णयाचे महिला भगिनी तर्फे स्वागत…….१५ दिवसांपासून कुठे आहे बेपत्ता?
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.24जुलै):-साकोली शहरात एका अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य करणारा डॉ. देवेश अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज चार दिवसांपूर्वी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. यातच आता फरारी असलेल्या आरोपी डॉक्टरला हायकोर्टानेही दणका दिला आहे. आरोपी डॉ. देवेश अग्रवाल हा प्रचंड पैशाच्या जोरावर मात्र भारतीय न्याय व्यवस्थेला विकत घेऊ शकत नाही आणि या नागपूर उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे समस्त महिला जनतेने स्वागत केले असून अजूनही त्या आरोपी डॉक्टर विरोधात भंडारा जिल्ह्यात जनतेचा संताप अजूनही कायम आहे.
साकोली शहरातील श्याम हॉस्पिटल मध्ये ०९ जुलैला संचालक डॉ. देवेश अग्रवाल याने एका दलित अल्पवयीन मुलीसोबत अर्धा तास सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते. पोलीसांत तक्रार दाखल होताच तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि आता देशभरातील विविध शहरांमध्ये “ऑपरेशन लुक आऊट” सुरू केले.
तीन दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला. आता ( बुधवार २३ जुलै ) उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात त्याच्या वकीलाने अटकपूर्व जामीन अर्ज लावला होता. पण नागपूर हायकोर्टानेही त्या नराधम डॉक्टरला दणका देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सदर आरोपी डॉक्टर १५ दिवसांपासून अद्यापही फरारच आहे.
उच्च न्यायालयाने या नराधम डॉक्टराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला या निर्णयाचे समस्त महिला जनतेने स्वागत केले आहे. डॉक्टर देवेश अग्रवाल हा प्रचंड पैशाच्या जोरावर मात्र भारतीय न्याय व्यवस्थेला विकत घेऊ शकला नाही तर भारतीय संविधानात चुकीला माफी नाही म्हणूनच भारतीय न्याय व्यवस्था आज जिंकली आहे अशी प्रतिक्रिया साकोली शहरातील महिला पुरुष जनतेत उमटत आहे.
फरार असलेल्या आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याला शोधण्यासाठी भंडारा जिल्हा पोलीसांनी संपूर्ण भारतातील विविध पोलीस ठाणे येथे वायरलेस मॅसेज देऊन “ऑपरेशन लुक आऊट” सुरू केले आहे. काल याबाबद साकोली पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला.



