श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था व मेट्रो टाइम्स चा संयुक्त उपक्रम-“एक पेड माँ के नाम”: 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन 69 हजार झाडे लावणार

63

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

भंडारा(दि.24जुलै):- श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था गणेशपुर भंडारा व मेट्रो टाइम्स च्या वतीने एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

                                                 14 ऑक्टोंबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या दिवसाला अनुसरून “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम राबविण्याकरिता 69 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त 69 हजार झाडे लावण्याचा संकल्प संस्थेने हाती घेतलेला आहे. ही संस्था शाळा, महाविद्यालय, दवाखाना, मंदिर, मज्जिद, बुद्ध विहार, गिरजाघर शेत शिवार या ठिकाणी झाडे एक पेड मा के नाम या कार्यक्रमांतर्गत लावण्याचा संस्थेचा मानस आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर,

वर्धा, नागपूर ,अमरावती अकोला, वाशिम, यवतमाळ ,बुलढाणा या ठिकाणी मागणीनुसार झाडे लावण्याचा मानस आहे.

                                             राष्ट्रीय वननीती 1988 नुसार पर्यावरण समतोल राखण्याकरता एकूण भौगोलिक क्षेत्राला 33% भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे. तथापि महाराष्ट्र राज्य मध्ये तुलनात्मक दृष्ट्या हे प्रमाण कमी आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण व औद्योगीकरणामुळे वातावरण बदल होऊन जागतिक तापमान वाढ होत आहे. या समस्यावर मात करण्याकरता आणि प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य टिकविण्यासाठी वृक्षारोपण मोहिम अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य हरीतीकरणाला विविध योजना राबवून राज्याचे हरित आच्छादन वाढविण्यामध्ये आणि देशाच्या धोरणाला उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नामध्ये अग्रेसर आहे. राज्याने यापूर्वी 50 कोटी वृक्ष लागवड बेल, वन, अमृत वन, पंचायत वन अशा योजनांच्या माध्यमातून वनीकरणा सोबतच लोकसहभाग वाढविण्याचा आणि जनपरंपरांचा आधार घेऊन वन आणि वृक्ष संवर्धनाचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्ष खाली 4 जून 2025 रोजी झालेल्या बैठकीत सन 2025 च्या पावसाळ्या करिता राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान संकल्पनेतून सुरू असलेल्या एक पेड मा के नाम 2.0 ही मध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाच्या काळ म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत रुक्ष लागवडीसाठी लोकांना उपयुक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांच्या पुरवठा करण्यात येत असतो .वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांच्या कार्यक्रम हवा. त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारित केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांच्या पुरवठा केला जातो .त्यानुसार संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 18 जून 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे सन 2024 /25 साठी 15 जून ते 30 सप्टेंबर या वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात मान्यता देण्यात आली होती. आता सन 2025/ 26 या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यात यापूर्वी 50 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. आता सन 2025 च्या पावसाळ्यात 10 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडित क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा, तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात,सामूहिक पडित क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा. तसेच सर्वसामान्य शेतकरी व उत्सव प्रेमी यांना अल्प दरात रोपे उपलब्ध व्हावी यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांच्या पुरवठा करण्यात येईल. चालू वर्षी रोपे निर्मिती करते वेळेस बियाणांचा स्त्रोत, बियाणांची प्रतवारी व उपचार पाले बॅगचे आकारमान मिश्रण रोपांची मिळवणे रोपांची प्रतवारी निश्चित करून वन महोत्सवाच्या कालावधीत आणि सर्वसाधारण कालावधीत रोपांचा पुरवठा सन 2025-26 या आर्थिक वर्षात खालील नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

ज्या शासकीय यंत्रणांना स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करायची आहे व यांच्याकडे जागा उपलब्ध आहे मात्र त्यांच्याकडे रोप निर्मितीसाठी कोणतेही प्रकारची आर्थिक तरतूद नाही अशा यंत्रणांनी संस्था यांनी तसे प्रमाणपत्र सादर केले असताना या वन महोत्सव कालावधी जागेची उपलब्ध दर्शविल्यास प्रति हेक्‍टरी 1000 या मर्यादेपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी मागणीनुसार वृक्ष लागवड करण्यासाठी रोप रोपांच्या पुरवठा नजीकच्या रोपवाटिकेतून रोपांच्या उपलब्ध नुसार केला जाईल अशी माहिती पत्रकाद्वारे संस्थेचे संचालक विजयकुमार डहाट, रंजना घरडे, सिद्धार्थ मेश्राम, पुष्पा गोवर्धन कराडे यांनी केली आहे.