

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.24जुलै):-साकोली शहरातील दिवसेंदिवस जनता आता जागृत होत आहे. कारण एक निर्भिड पत्रकार जी भाषा वापरून यांवर लिहीत आहे ते अगदी १००% टक्के सत्य असून मात्र येथील झोपाळू काही झोपेतून उठायला तयार नाहीत” असे प्रतिपादन भरचौकात करीत एका जागृत उच्चशिक्षित युवकाने थेट सामाजिक प्रसारमाध्यमांवर आपली निर्भिडपणे प्रतिक्रिया लिहून जनतेलाही जागरूक होण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
या निर्भिड व उच्चशिक्षित साकोली सेंदूरवाफा येथील युवकाचे नाव आहे “गणेश बोरकर”, यांनी बोलतांना सांगितले की, अजून किती एक जागृत निर्भिड मिडिया तुम्हाला झोपेतून उठविणार.? तुम्हा जनतेचे काही कर्तव्य आहे की नाही. यासाठी मंगळवारी ता. २२ जुलैला थेट सोशल मिडीयातून लिहिले की, “आता तर साकोलीत संयमाची हदच झाली, म्हणतात ना जेवढी जनता अनपढ, अडाणी व गावठी छाप, निष्क्रिय असेल तर त्याचा फायदा नक्कीच प्रशासन व अधिकारी घेतल्याशिवाय राहणार नाही, नेमकं हेच घडत आहे सेंदूरवाफा शहराबाबत मागील २०१५, २०१६ पासून सेंदूरवाफा गावाचे साकोली नगरपरिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे सहाजिकच घर टॅक्स व इतर करांमध्ये भरमसाठ प्रमाणात वाढ झाली. परंतु साकोली नगर परिषद मध्ये समाविष्ट झाल्यामुळे जो फायदा सेंदूरवाफा गावाला व्हायला पाहिजे तो आजपर्यंत झालेला दिसत नाही. पक्के सिमेंटचे रस्ते, घरोघरी नळ योजना, लाईटची समस्या ह्या आजही भेडसावत आहेत. याला जेवढे विकासाचे दृष्टिकोन नसलेले लोकप्रतिनिधी जबाबदार तेवढेच सेंदूरवाफा येथील जनता सुद्धा जबाबदार आहे.
कारण सेंदूरवाफा येथील जनता कधीच आपल्या रास्त मागण्यांसाठी समोर आलेली नाही. आता हेच बघा ना, पावसाळा सुरू झाला असून मागील पाच सहा दिवसांपासून कोणत्याही प्रकारचा जोरदार वादळ वारा व पाऊस नसताना सुद्धा रात्रीला जवळपास दहा ते बारा वेळ वारंवार इलेक्ट्रिक विभागातर्फे लाईट बंद करण्यात येत आहे. लाईट वारंवार बंद होत असल्यामुळे झोप पूर्ण होत नसून वयोवृद्ध व लहान बालकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. सेंदूरवाफा हे गाव साकोली नगरपरिषद मध्ये समाविष्ट असून सुद्धा सेंदुरवाफा गावाला लवारी ह्या ग्रामीण गावाच्या फिडरवरून लाईट देण्यात आलेली आहे. लवारी गावाच्या फिडरवर कृषी पंप व इतर गावांची लाईन असल्यामुळे वारंवार लोड वाढून लाईट जात असते.
त्यामुळे सेंदूरवाफा गावाला साकोली पावर हाऊस वरून नेहमी करिता लाईट देण्यात यावी व कोणतेही ठोस कारण नसताना सेंदूरवाफा येथील वारंवार लाईट बंद करण्यात येऊ नये. साकोली सेंदूरवाफा हे एकाच नगरपरिषद मध्ये असल्यामुळे साकोलीला ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा सेंदूरवाफा गावाला सुद्धा मिळाले पाहिजेत याकरिता सेंदूरवाफा येथील जनतेने समोर यायला हवे कारण समोर नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत एकदा निवडणुका आटोपल्या की समोर कुणीच ५ वर्ष लक्ष देणार नाही” हा मॅसेज टाईप करून व्हायरल करताच या जागृत युवक गणेश बोरकरची जागोजागी शहरात चर्चा सुरू आहे. आणि जनताही आता यासारखे निर्भिड रूपी बनू पाहत आहे.
रविवार २० जुलैला सायं. ५:१५ दरम्यान सामाजिक कार्यकर्ता राजू खडसिंगे यांसह हेच युवा गणेश बोरकर नगरपरिषद चौकात आले. व दोन चार लोकांसमोर बोलून दाखविले की, एक “साकोली मिडीया” नावाचा अनामिक आणि निर्भिड पत्रकार अश्या झोपलेल्या जनता व प्रशासनावर रोखठोकपणे लिहीतो त्याचे संपूर्ण १००% टक्के एकुण एक शब्द सत्य स्थिती आहे. व याची दखल येथील जनतेने घेतली असती तर आज साकोली लाखनी, देवरी व सडक अर्जूनी पेक्षाही सुंदर व आलीशान सिटी दिसली असती या शब्दात युवा उच्चशिक्षित गणेश बोरकर यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकारात सोशल मिडीयातून गणेशची सर्वत्र चर्चा होत आहे.



