जिल्हास्तरीय समिती करणार रिसोर्ट मधील स्वच्छतेच्या घटकाची पाहणी 

180

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25जुलै):- स्वच्छता ग्रीन लीप च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची प्रभारी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरावर विस कलमी सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली . चंद्रपूर जिल्ह्यात 120 रिसॉर्ट असून,सदर बैठकीत स्वच्छता ग्रीन लीपच्या अनुषंगाने रिसॉर्ट मालक धारकांनी सर्वप्रथम केलेले स्वयं मूल्यांकन अहवाल व प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तपासणी केल्याचे अहवाल गुणानुक्रमाने तपासण्यात आले.

बैठकीत मूल्यांकनाविषयी चर्चा करण्यात आली. स्वच्छता ग्रीन लीपच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत किमान 140 गुण प्राप्त करणाऱ्या व त्यावरील गुण प्राप्त करणाऱ्या रिसोटची तपासणी जिल्हास्तरीय समिती कडून करण्याचे ठरविण्यात आले.

सदर बैठकीला स्वच्छता ग्रीन लीप जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष,प्रभारी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, स्वच्छता ग्रीन लीप जिल्हास्तरीय समितीचे सद्स्य सचिव ,चंद्रपुर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत, सदस्य ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना साळुंखे, उपाध्यक्ष रिसोड संघटना चंद्रपूरचे संजय ढिमोले ,स्वच्छ भारत मिशनचे संजय धोटे व कृष्णकांत खानझोडे या बैठकीला उपस्थित होते.