

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.26जुलै):- न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरच्या शेकडो विद्यार्थ्यांनी शासन आदेशाप्रमाणे व मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार व सर्व वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या घरातील अंगणात व परिसरात स्वतःच्या आईसोबत एक वृक्ष लावून वृक्षारोपणाला उत्स्फूर्तपणे मदत केलेली आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांनी दररोज वृक्षारोपणाबाबत विद्यार्थ्यामध्ये जागृती निर्माण केली.पर्यावरणाला मदत होवू शकेल व झाडांचे उपयोग व महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.दरदिवशी ” एक पेड माँ के नाम” या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे.
या उपक्रमाचे संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व पालकांनी कॊतुक केलेले आहे.विद्यार्थ्यांनी सर्व फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड करून आनलाईन प्रमाणपञ मिळविलेले आहे.” एक पेड माँ के नाम” हे वृक्षारोपणाचे राष्ट्रीय कार्य न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरच्या विद्यार्थ्यी उत्स्फुतपणे करीत आहे.



