

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.२६जुलै):- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरीत सेना, इको क्लब,स्काऊट – गाईड्स युनिटच्या विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हे युद्ध कसे घडले याचा लघु चित्रपट दाखविण्यात आला व माहिती देण्यात आली. या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काउट्स मास्तर यांची उपस्थिती होती.
तर प्रमूख अतिथी म्हणून रूपेश चीडे, स्काउट्स मास्तर, सुनीता कोरडे, रोशनी कांबळे, गाईड्स कॅप्टन, प्राजक्ता साळवे यांची उपस्थिती होती. २६ जुलै १९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगील जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील जागांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे औचित्य साधून दरवर्षी २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थांनी कारगिल युद्ध कशा पद्धतीने लढल्या गेले याचे एक लघु चित्रपट बघितला.
“भारत माता की जय ” अश्या जयघोषाने परिसरात देशभक्तीमय वातावरण तयार झाले. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटाचे मौन घेण्यात आले. राष्ट्रीय हरित सेना, स्काउट्स गाईड्स युनिट वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता अभियान, जनजागृती सोबतच देशभक्तीचे धडे सुद्धा बालवयात मिळावे याकरीता सातत्याने विविध प्रकारचे शालेय उपक्रम राबवित असते.



