

चिमूर- थोर क्रांतीकारी संत, विदर्भाच्या पावन भूमीतील भारतमातेचे महान सुपुत्र, समाजाच्या व राष्ट्राच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे जननायक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना मानाचा मुजरा करण्यासाठी भारत सरकारने भारत देशाचा सर्वोच्च बहुमान भारतरत्न प्रदान करून त्यांच्या महान कार्याचा गुणगॊरव करावा अशी आग्रही मागणी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरुजी यांनी केलेली आहे.
निवेदनातून ते पुढे म्हणतात की, ही मागणी सन २००३ पासून भारत सरकारडे लावून धरली यापूर्वी लोकसभेत व विधानसभेतही या मागणीवर चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाने व भारत सरकारच्या गृह विभागाने या मागणीची शिफारस केलेली आहे तरी गेली बावीस वर्षे यावर निर्णय होत नाही ही तीव्र खेदजनक बाब आहे.
अनेक महापुरूषांना मागणी नसताना भारतरत्न सन्मान मिळाले आहेत.परंतू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे कार्य तुलनेने भारतरत्न सन्मानाच्या पलीकडचे असुनही भारताचा सर्वात मोठा हा सन्मान असल्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजेच भारताच्या सर्वसामान्य जनतेचा सन्मान आहे.या दोन महापुरूषांना भारतरत्न देणे हा भारत सरकार, महाराष्ट्र सरकारचाही सन्मान आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे तरी त्वरित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी राजेंद्र मोहितकर गुरूजी यांनी केलेली आहे.



