पंचायत समिती सावली येथे प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांचा डोंगर – शिक्षकांमध्ये असंतोष

57

 

 

 

सावली (प्रतिनिधी)- पंचायत समिती सावली येथे जवळपास ३०० शिक्षक कार्यरत आहेत. संघटनेनी शिक्षकांचे समस्या संदर्भात वारंवार निवेदने देण्यात आली मात्र येथील शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या उर्मट वागण्याने व कामाच्या निष्काळजीपणामुळे प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. मुळ सेवापुस्तकात ३-४ वर्षाचे वार्षिक वेतनवाढीचे नोंद नाही.सातवा वेतन आयोग लागू होऊन व प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होऊन ६ वर्ष पूर्ण झालीत मात्र सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याच्या नोंदी अद्ययावत नाहीत. परीक्षेची परवानगी प्रस्ताव मंजुरीसाठी टाळाटाळ करणे, सोसायटी च्या कर्ज मागणी अर्जावर सही करण्यास शिक्षकांना ताटकळत ठेवणे, अर्जित रजा मंजुरीसाठी लक्ष्मी दर्शन, मुळ सेवा पुस्तक जिल्हा परिषद ला पडताळणीसाठी पाठविण्यास विलंब करणे, जे शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत अशांच्या सेवा पुस्तकासोबत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांची पण ५ ते ६ मुळ सेवापुस्तक पाठविण्यात यावी अशी संघटनात्मक विनंती गटशिक्षणाधिकारी व संबंधित कर्मचारी यांना केली मात्र कुठलीही दखल घेतली जात नाही. प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांचा निपटारा करण्याचे नियोजन शुन्य ते मुळे प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांचा डोंगर आवासून उभा आहे.
समस्यांच्या प्रलंबित पणामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. पंचायत समिती सावली येथील गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी शिक्षकांसोबत सौजन्याने वागत नसून अपमानास्पद वागून देतात व क्षुल्लक कामासाठी ताटकळत ठेवतात अशी शिक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे.
पंचायत समिती सावली च्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची वागणूक राहिल्यास भविष्यात तालुका सावली प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक, सहनिमंत्रक व पदाधिकारी यांनी दिलेली आहे.