चिमूर येथे जिल्हास्तरीय लिटिल राधाकृष्ण स्पर्धा 3 ऑगस्टला-इंडियन आयडॉल विजेता वैभव गुप्ता करणार परीक्षण

87

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जुलै):– श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त चिमूर शहरात जिल्हास्तरीय लिटिल राधाकृष्ण स्पर्धा 2025 चे आयोजन 3 अगस्त ला करण्यात आले असून 5 ते 15 वर्षाखालील बालकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

       चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचे विशेष सहकार्याने टीम राधा कृष्णच्या नेतृत्वात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्य जिल्हा स्तरीय लिटिल राधाकृष्ण स्पर्धा 2025 चे आयोजन अभ्यंकर मैदान चिमूर येथे दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 2 वाजता करण्यात आले आहे.

                                               लिटल राधाकृष्ण स्पर्धेत 5 ते 15 वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. 1 ते 9 व 10 ते 15 असे दोन वयोगट पाडण्यात आले असून दिनांक 1 ऑगस्ट पर्यंत स्पर्धांना या स्पर्धेत नोंदणी करता येणार आहे. स्पर्धकांनी ट्रान्स्फर डान्स अकॅडमी चिमूर येथे 8551895665 या नंबर वर 1 ऑगस्ट पर्यंत संपर्क करावा.

                                        स्पर्धेकरिता विजेत्या स्पर्धकांना आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांचे कडून उत्कृष्ट राधा 5 हजार रुपये व उत्कृष्ट कृष्ण 5 हजार रुपये पुरस्कार रक्कम मिळणार आहे. स्पर्धेकरिता विशेष परीक्षक वैभव गुप्ता, सहपरीक्षक म्हणून शिवम गणवीर, सुमित तिलोकानी परीक्षण करणार आहेत. 

        राधाकृष्ण लिट्ल स्पर्धेत जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावे असे आवाहन तेजस मिसार, गुरुदास ठाकरे, माधुरी कावरे, मनिषा घाडगे, ज्योती केमये यांनी केले आहे.