

▪️समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत गटसाधन केंद्र येथे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत- दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता करतात कार्य
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.३०जुलै):- गटसाधन केंद्र पंचायत समिती राजुरा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. राजकुमार विठ्ठल भुरे विशेष शिक्षक हे समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत गटसाधन केंद्र राजुरा येथे कार्यरत असून दिव्यांग विद्यार्थ्यांकरता कार्य करीत आहेत. ते वृक्ष लागवडीचा छंद जोपासत आहेत. दरवर्षी राजकुमार भुरे हे आपला वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरा करतात.
यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्या कार्यालयाच्या परिसरात कडूनिंब वृक्षाचे रोपण करून व त्याला ट्री गार्ड लावून वृक्षांचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखन्यास हातभार लावलेला आहे. त्यांनी आतापर्यंत वड, पिंपळ, कडूनिंब, करंज, आंबा, पेरू, इत्यादी वृक्षांचे रोपण करून त्यांचे संवर्धन केले आहे. सदर वृक्षांची रोप घरातीलच टाकाऊ पिशव्यांमध्ये तयार करून दुसऱ्या वर्षी त्यांची लागवड करीत असतात. या उपक्रमांतून ते ‘झाडे लावा झाडे जगवा आणि हरित तृणांनी धरती नटवा’ असा बहुमूल्य संदेश देतात. वृक्षरोपण करणे जेवढे महत्त्वाचे आहे त्याहीपेक्षा वृक्षांचे संगोपन करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. असा संदेश ते नेहमी देत असतात. सदर कार्यक्रमाकरिता त्यांचे सहकारी मित्र दिवाकर चाचरकर यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभत असते.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यालयाच्या प्रमुख मंगला तोडे ,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा, सावन चालखुरे, विस्तार अधिकारी (शिक्षण), सचिन मालवी ,विस्तार अधिकारी (शिक्षण) , विशाल शिंपी ,विस्तार अधिकारी (शिक्षण) पंचायत समिती राजुरा, तसेच नारायण तेलकापल्लीवार केंद्रप्रमुख, प्रभाकर जूनघरी केंद्रप्रमुख, दिवाकर चाचरकर, देवेंद्र रहांगडाले, आशिष बहादुरे, मंगला सोमलकर, नीलाताई डोरलीकर, मनीषा वांदिले, सूर्यकांत ढगे , राहुल रामटेके , राकेश रामटेके, मुसा शेख, गीता जांबुलवार, रिता देरकर, ज्योती गुरनुले, राजू रामटेके, अजय सूर्यवंशी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.



