तिबेटी राष्ट्रपती पेम्पा त्सिरिंग यांचे भंडारा येथे स्वागत व मार्गदर्शन-भारत तिबेट मैत्री संघाचे आयोजन 

60

✒️संजीव भांबोर(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

भंडारा(दि.31जुलै):- निर्वासित तिबेट सरकारचे राष्ट्रपती पेंम्पा त्सिरिंग यांचा भंडारा येथे दिनांक 30 जुलै रोजी सर्किट हाऊसमध्ये स्वागत व मार्गदर्शनाचा कार्यक्रम भारत तिबेट मैत्री संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला. 

                                           सर्वप्रथम खतक, शाल व पुष्पगुच्छ देऊन तिबेटी राष्ट्रपतींचा सत्कार करण्यात आला नंतर भंडाऱ्यातील विविध संघटनेतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

         मंचावर निर्वासित तिबेट सरकारचे गृहसचिव, तिबेटन सेटलमेंट ऑफिसर त्सांगपा तेंजिन, तिबेटियन लोकल असेंब्ली च सभापती छ्यो ग्यालसन, भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य अध्यक्ष अमृत बनसोड उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पेंम्पा त्सिरिंग म्हणाले की, भारत व तिबेटचे शेकडो वर्षापासून धार्मिक व सांस्कृतिक संबंध आहेत. सातव्या शतकात तिबेटमध्ये बौद्ध धर्म गेला त्याबरोबरच भारतातील बौद्धांची अमूल्य ग्रंथसपदा तिबेटमध्ये गेली. तिबेटने बौद्ध साहित्य व तत्वज्ञानाचा अनुवाद करून बौद्ध साहित्याचे जतन करून ठेवले आहे.

त्यामुळेच आज भारतात बौद्ध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. दलाई लामा जगभर करुणा, मैत्री, बंधूभाव व शांतीचा प्रचार व प्रसार करीत आहेत त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराबरोबरच जगभरातील पाचशेच्या वर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दलाई लामा आता ९० वर्षाचे झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी पुढच्या दलाई लामाच्या पुनर्जन्माची घोषणा केली आहे. भारत सरकार व भारतीय जनतेचे निर्वासित तिबेटी समुदायावर खूप उपकार आहेत. पुढे सुद्धा भारतीयांनी तिबेटच्या समस्येच्या समाधानाकरिता सहकार्य करावे.

                                        कार्यक्रमाचे संचालन भारत तिबेट मैत्री संघाचे जिल्हा सचिव मोरेश्वर गेडाम, प्रास्ताविक राज्याध्यक्ष अमृत बन्सोड यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसठी महेंद्र गडकर, महादेव मेश्राम, रोशन जांभुळकर, रूपचंद रामटेके एम. डब्ल्यू. दहिवले, सिद्धार्थ चौधरी, असित बागडे, एडवोकेट डी .के. वानखेडे, रमेश जांगडे, तुलसीदास शेंडे, राजेश मडामे, के.एल. देशपांडे, अनमोल देशपांडे, विजय सावध, अनिल पाटील, मंगेश बडगे, अरविंद काणेकर, राजकुमार बन्सोड, मनोज खोब्रागडे, अजय तांबे, अर्जुन गोडबोले, मदनपाल गोस्वामी, दीपक गजभिये, सुमित शामकर,आनंद गजभिये यांनी सहकार्य केले .