महातपुरी जिल्हा परिषद शाळेत वसंतराव नाईक जयंती साजरी

157

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.1जुलै):-शेतकऱ्यांशी कायम नाळ जुळउन कठीण काळातही क्रांतीकारी कार्य ज्यांनी केले.त्या वसंतराव नाईकांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणून संबोधतात अशा महान हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती तालुक्यातील महातपुरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक 1 जुलै मंगळवार रोजी साजरी करण्यात आली.

वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अमजद,मुख्याधापक लांडगे सर, शिक्षक आर.एफ.राठोड,चव्हाण सर, सूर्यवंशी सर,लांडगे सर,रोडगे सर, वाकडे सर,सोनवणे सर,फड सर,खोडवे सर,चव्हाण, शेख निसार,बल्लाल सर, शेख पाशा,गिरी मॅडम,जोशी मॅडम, भोसले मॅडम,चिलगर मॅडम,धोंडगे मॅडम,तेरकर मॅडम आदीसह शाळेतील विध्यार्थी, कर्मचारी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्तावित राठोड सरांनी केले तर आभार बल्लाल सरांनी मानले