

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगांव(दि.1जुलै):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्याकडून मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार यांनी ग्रामीण रुग्णालयास रक्तगट तपासणी संदर्भात लेखी विनंती पत्र दिले आणि तात्काळ ग्रामीण रुग्णालयाने होकार देऊन दररोज २५ मुला मुलींचे गट तयार करून सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
डॉ.मनोज पाटील ( वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय धरणगाव ) डॉ.संजय चव्हाण ( तालुका आरोग्य अधिकारी धरणगाव ) यांच्या मार्गदर्शनाने व जितेंद्र चव्हाण ( वैद्यकीय अधिकारी ) यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय डॉक्टर व कर्मचारी वृंद यांच्या अनमोल सहकार्याने यशस्वीपणे रक्तगट तपासणी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी ग्रामीण रुग्णालय धरणगावचे वैद्यकीय अधिकारी व सर्व टीमचे आभार व्यक्त केले. ही रक्तगट मोहीम यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे, एस एन कोळी, एच डी माळी, पी डी पाटील, ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी अनमोल सहकार्य केले.



