माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत ०४ जुलै रोजी तहसील कार्यालय दहिवडी येथे

87

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.1जुलै):-माण तालुक्यातील सन २०२५ ते ३२०३० या कालावधीसाठीचे ९५ ग्रामपंचायती मधील सरपंच पदाचे आरक्षण आळीपाळीने (चक्रानुक्रमे) पद्धतीने होणार असून, ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचने नुसार त्याबाबत विशेष सभेचे आयोजन दहिवडी येथे करण्यात आले आहे.

सातारा जिल्हाधिकारी यांच्या 20 जुलै रोजीच्या आदेशानुसार, माण तालुक्यातील बिगर अनुसूचित ९५ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालय माण (दहिवडी) येथे दि ०४ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असल्याचे माण तालुका तहसीलदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

तसेच याबाबत गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, व ग्रामसेवक यांचेमार्फत जाहीर प्रकटने करून आरक्षण सोडतीवेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार माण यांनी केले आहे