माझी बायको माझी मेव्हणी या लघुपटाचे चित्रिकरण पूर्ण

110

✒️विशेष प्रतिनिधी(जगदीप वनशिव)

पुणे(दि.1जुलै):- येथील तृप्ती फिल्मचे निर्माते रामदास राऊत यांच्या ” माझी बायको माझी मेव्हणी ” या विनोदी लघुपटाचे चित्रिकरण ज्ञानाई फाऊंडेशन कला साहित्य विचारमंच व नरके पॅलेस हेवन पार्क पुणे येथे पार पडले .

ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, ज्ञानाई फाऊंडेशन कला साहित्य विचारमंच चे अध्यक्ष लोककवी अभिनेते सीताराम नरके आणि तृप्ती फिल्मचे रामदास राऊत यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुखमिनीच्या मूर्तीची व कॅमेऱ्याची पूजा करण्यात आली व श्रीफळ वाढविण्यात आले .

    आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी तिच्या मुली नवऱ्याला घेऊन माहेरी येतात . दोन्ही मुली व त्यांचा भाऊ एक योजना आखतात .

ही योजना काय आहे ? योजनेचा फायदा कुणाला होतो ? हे प्रत्यक्ष पहाण्यात खरी मजा आहे . या लघुपटात

२८ कलावंताना आपला अभिनय करण्याची संघी मिळाली आहे .

सुनील गोडबोले,रामदास राऊत,विशाल ससाणे,संतोष सोनवणे,बबनराव चाटे,भक्ती परदेशी,अंजना,दोडके,सीताराम नरके,सुदाम डफळ,राजेश मेमाने,रुपाली सोनावणे,नितीन वेताळ,राजेंद्र ताम्हाणे,प्रकाश वाघमारे,उदय उपाध्ये,खंडू भुकन सुदाम डफळ ,निळकंठ चौरे,विशाल सोमवंशी,राजेंद्र डांगरे,आकाश कॅमेरामॅन,विजया नरके,गायत्री नरके,माधुरी नरके, हरित नरके,डॉ . चारूदत्त नरके, रानकवी जगदीप वनशिव,दशरथ दुनधव,निकिता जगताप अश्विनी जगदाळे . या सर्व कलाकारांनी आपआपली भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे .

   चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांनी “माझी बायको माझी मेव्हणी ” हा लघूपट म्हणजे रसिकांना हास्याची मेजवानीच असल्याचे सांगितले .