

✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अंबाजोगाई(दि.5जुलै):- तालुक्यातील देवळा येथील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने गावातून स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले. .
याबाबत सविस्तर असे कि, अध्यात्माला स्वच्छतेची व आरोग्याची जोड देऊन समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी देवळा येथील सदरील विद्यालयाच्या वतीने स्वच्छता दिंडी आयोजित करण्यात आली होती. या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात टाळ – मृदंगाच्या गजरात गवळणी व अभंगाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.
गावातील सार्वजनिक ठिकाणाची विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता केली. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक खोसे एस. जे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावकरी यांनी परिश्रम घेतले.



