

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.6जुलै):- सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांच्या वाढदिवसाचे निम्मिताने त्यांचे मित्र समूह चे वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविणेत आले यामध्ये सालाबाद प्रमाणे प्रामुख्याने शिंदी बुद्रक येथील प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करणेत आले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्तिथ होते.याच बरोबर एहसास मतिमंद स्कूल वळसे येथील विद्यार्थ्यांना भोजनदान देखील करणेत आले. आपले वाढदिवसाचे निम्मिताने सातारा जिल्ह्याची सुपुत्री राष्ट्रीय धावपटू पोलीस कन्या कु. सुदेष्णा शिवणकर हिस पुढील वाटचालीसाठी छोटीशी मदत तिच्या वडिलांकडे सुपूर्द करणेत आली.
सह्याद्री दुर्ग प्रतिष्ठान सज्जनगड यांना दुर्ग संवर्धन कामी मदत तसेचआषाढी वारी पालखी सोहळ्या दरम्यान सातारा जिल्हा पोलीस दलाने सूक्ष्म नियोजन करून महत्वाचा समजला जाणारा पालखी बंदोबर उत्कृष्टरित्या पार पाडल्याने सातारा पोलीस बॉईज तर्फे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांचा देखील सन्मान करणेत आला. आगामी काळात ही सातारा पोलीस बॉईज च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी कायम आग्रही राहणार असेलचे श्री. खरात यांनी सांगितले. वाढदिवसाच्या निम्मिताने विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.



