अहेरीचे अपर जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकरी संजय आसवले यांचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून स्वागत…!

78

✒️अहेरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहेरी(दि.7जुलै):- नुकतेच अहेरी येथे रुजू झालेल्या अपर जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकरी संजय आसवले साहेबांची आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आली आहे.

दरम्यान अहेरी क्षेत्रातील कंकडालवारांनी अपर जिल्हाधिकारी साहेबांना अनेक समस्यांबाबत माहिती दिली.उपविभागातील अनेक समस्या शासन स्तरावर पोहोचवून त्यांचे निराकरण करण्याची विनंती केली.नव्या अपर जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकरी संजय आसवले साहेबांनी अहेरी क्षेत्रातील विकासासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम आदी उपस्थित होते.