

▪️धारासुर येथे पारावरची चावडी बैठकीला संबोधित करत असताना केला निर्धार
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
मी मराठा समाजाचं लेकरु म्हणून ही लढाई लढत आहे या आंदोलनात मला तुमची गरज आहे तुमच्या शिवाय ही आरक्षण लढाई मी लढु शकत नाही सरकारच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनात फुट पाडुन आंदोलन बदणाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी काहीही केले तरी मी माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मराठा समाजाशी प्रामाणिक राहून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच असा ठाम निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
तालुक्यातील धारासुर येथे (दि.10 जुलै गुरुवार) रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पारावरची चावडी बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.मराठा आरक्षणासाठी गेली दोन वर्षे आंदोलन करणारे मनोज जंरागे पाटील हे अचानक धारासुर या गावी आले त्यांच्या अचानक येण्यामुळे गावातील समाज बांधवांची धावपळ उडाली गुरुवारी सायंकाळी 7 वाजता चावडी बैठक सुरू झाली या बैठकीस गंगाखेड तालुका समन्वयक श्रीकांत भोसले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले गेली दोन वर्षे आपण आरक्षणाची लढाई लढत आहोत येत्या 29 ऑगस्ट रोजी आपल्याला आरक्षणाची शेवटची लढाई मुंबईमध्ये लढायची आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मुंबईला याव असे आवाहन केले सरकारने सगे सोयरेचा अध्यादेश काढला पण त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे फडवणीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज कुणबी आहे मिळालेल्या नोंदीच्या आधारे त्याचे कायद्यात रूपांतर करून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा सरकारला येत्या 29 ऑगस्टला मराठ्यांची ताकद कळेल असा दम सरकारला दिला.परावरच्या चावडी बैठकीस गंगाखेड तालुका परिसरातील व धारासुर गावातील मराठा समाज बांधव माता भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी धारासुर गावातील सकल मराठा समाज बांधवांनी परिश्रम घेतले
*लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला येणार-श्रीकांत भोसले*
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी उपोषणामार्फत दोन वर्षापासून आरक्षणाची लढाई लढत आहेत त्यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी गंगाखेड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या सकल मराठा समाज आरक्षण मोर्चाला येणार आहेत यात काही शंका नाही असा शब्द गंगाखेड तालुका समन्वयक श्रीकांत भोसले यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला



