सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा त्रिगुणे यांचे निधन

133

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.12जुलै):-म्हसवड, ता . माण, जि. सातारा येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा सोमा त्रिगुणे (वय 96 )यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

ते सणगर समाजातील एक शांत व्यक्तिमत्त्व असून वैभव गणेश मंडळाच्या स्थापनेत योगदान दिले होते. विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग होता. म्हसवड येथील प्रसिद्ध घोंगडी व्यवसायामध्ये स्वतः घोंगडी विणकाम करून विक्री व्यावसायामध्ये चाळीस वर्षे सक्रिय होते. त्यांच्या पश्चात 2मुले सुना ,नातवंडे इत्यादी परिवार आहे.