न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा आराध्य जुमडे याची शिष्यवृत्तीसाठी निवड

70

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12जुलै):-न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा आराध्य जुमडे याची शिष्यवृत्तीसाठी निवड न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा विद्यार्थी आराध्य वामन जुमडे याची इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतून निवड झालेली आहे.

         सन २०२४- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृती परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे.न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचे मुख्याध्यापक एस.आर.खोब्रागडे व सर्व शिक्षक— कर्मचार्यांच्यावतीने आराध्य जुमडे याचे अभिनंदन करण्यात आलेले आहे.आराध्य आपल्या यशाचे श्रेय न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचे सर्व शिक्षक,आईवडील व मिञमंडळीला देतो.