

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.13जुलै):-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषद समोर सुरू असलेल्या घंटागाडी आणि मनुष्यबळ पुरवठा संदर्भातील साखळी उपोषणाला आज 11 दिवस पूर्ण होत आहेत. या उपोषणाच्या दरम्यान, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक संवेदनशील पाऊल उचलण्यात आले.
आज सकाळी 8 वाजता, तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्हज व मास्क वाटप करण्यात आले. हे साहित्य कामगारांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असले तरी सध्या कंत्राटदाराकडून पुरविले जात नसल्यामुळे, वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला.
कार्यक्रमाला जिल्हा महासचिव डी. के. दामोदर, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष भारत कांबळे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संदीप आढाव, मधुकर सोनवणे, मधुर खिल्लारे, जयानंद भालेराव, सचिन खंदारे, अमोल खंदारे, गोलू शिंदे, क्रांतिवीर भालेराव, राहुल धुळे आणि रुपेश सूर्यवंशी उपस्थित होते.
हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीची सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांची संवेदनशीलता अधोरेखित करणारा ठरला. उपोषण सुरूच असून, संबंधित भ्रष्ट व्यवस्थेवर कारवाई होईपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असे यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले.



