जेष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे दुःखद निधन-आंबेडकरी चळवळ निराधार पोरकी, झाल्याची कार्यकर्त्यांची भावना

209

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.. 9075686100*

 

 

म्हसवड (सातारा ) :
ज्येष्ठ पत्रकार कालकथित रमेश आढाव यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 63 व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले 19 जुलै रोजी त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी गुणवरे येथे सकाळी सात वाजतां अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या लेखणीतून सामान्यांना न्याय देणारे माजी उपसरपंच, शिक्षक , भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष एक धडाडीचे पत्रकार आयु. प्रा रमेश आढाव सर फलटण तालुक्यात परिचित होते.

फलटण शहरातील तालुक्यातील गरीब, गरजूंचा आधार म्हणून तसेच आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक म्हणून ज्यांच्या कडे पाहिले जात होते . पत्रकारी मध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारे,चळवळी मध्ये पँथर घडविनारे त्यांना मार्गदर्शन करूण चळवळीचे पवित्र कार्य न डगमगता अखंड चालू ठेवा , तुम्हाला या कार्याला पूर्ण यश येईल असा भरवसा देणारे
जेष्ठ पत्रकार, समाजसेवक, चळवळीचा आधार गरीब , गरजूंना, मदतीचा हात आज नाहीसा झाला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.