जाभूळणी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा ; स्वराज बाबर राज्यात सहावा

160

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये माण तालुक्यातील जि प शाळा जांभुळणी शाळेच्या स्वराज बाबर याने उत्तुंग यश मिळवले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत
इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्वराज संजय बाबर 286 गुण मिळवून राज्यात 6 वा व जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तसेच या शाळेतील समाधान अर्जुन काळेल256गुण मिळवून
शिष्यवृत्तीधारक झाला.
शाळेच्या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका श्रीमती निलोफर देसाई मॅडम ,बाबर मॅडम ,शेळके सर ,आटपाडकर सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा थोरात मॅडम केंद्रप्रमुख मा. श्री नंदकुमार तुपे , गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती माणचे श्री लक्ष्मण पिसे यांनी अभिनंदन केले.