

प्रतिनिधी – पी डी पाटील सर
जळगांव – जळगाव येथे १८ वे कवयित्री बहिणाबाई व सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय शाळा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर असते. शाळेमध्ये वर्षभरात विविध विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळेल अशी उपक्रम शाळा राबवित असते. शाळेचे संचालक मंडळ या उपक्रमांना प्रोत्साहन देते. गुणवत्तेवर आधारित अनेक उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. अशा नामांकित शाळेतील उपक्रमशील शिक्षक सत्यशोधक सोपान हुना भवरे यांना खान्देशस्तरीय बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते जळगाव येथे सन्मानित करण्यात आले.
सदर शिक्षक हे कृतिशील, उपक्रमशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे. अनेक विद्यापीठीय स्तरावरील शोधनिबंधात त्यांचे लेख छापून आलेले आहे. नेहमी वेगवेगळ्या ज्ञानाने संस्कारित व्हावं असे त्यांना वाटते. त्यासाठी त्यांनी अनेक विषयाचा अभ्यास होण्यासाठी अद्यावत शिक्षण चालू ठेवले आहे.
शाळेतील विविध कार्यक्रमात त्यांचा मोलाचा वाटा असतो. हे शिक्षक स्वतः पत्रकार सुद्धा आहेत. त्यांची पत्रकारिता अभ्यास पूर्ण असते. चौफेर विचार मांडण्याची त्यांची शैली अप्रतिम आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचे अप्रतिम योगदान आहे. त्यांची लेखणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकट होते. गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत कबीर ,संत रविदास ,संत तुकाराम हे त्यांचे आवडते महानायक आहेत. सतत विविध विषयांवर सरांचे लेखन चालू असते.
लेखन मंच साप्ताहिकाचे ते उपसंपादक आहेत. या अगोदर त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशन यांचा उपक्रमशील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुणे येथील मणीरत्न पुरस्कार मिळालेला आहे. दिपनगर येथील सामाजिक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या स्पष्ट व सडेतोड लिखाणासाठी ते प्रसिद्ध आहेत.
कोणत्याही प्रकारचा गर्व नसलेला हा निगर्वी व्यक्ती आहे. दुःखाकडे पाहण्याचा समतोल दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. प्रचंड मित्रांचा गोतावळा त्यांच्याकडे आहे. सर्व क्षेत्रातील त्यांच्या संपर्कात आहे. निस्वार्थ वृत्तीने काम करणे हा त्यांचा महत्त्वाचा स्वभावाचा गुण आहे. शाळेतील मुख्याध्यापक मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.



