

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड-सातारा(दि.19जुलै):-येथील कनिष्ठस्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. शिवाजी तरटे,उपाध्यक्ष ॲड. देवीदास मासाळ,सचिव ॲड. अमित पोळ,खजिनदार ॲड. सोनाजी काळेल, सह खजिनदार पदी ॲड. अनिल सरतापे,व महिला प्रतिनिधीपदी ॲड. सिमा संदिप पोळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
येथीव न्यायालयातील वकील बार कक्ष कार्यालयात वकील संघाच्या सदस्यांच्या सभेत एक वर्षाच्या कालखंडासाठी वरील पदाधिकारी यांच्या निवडी सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या.
यावेळी वकील संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी समवेत संघाचे सदस्य ॲड.सुदर्शन माने, ॲड. विलासराव गायकवाड,ॲड. डी,एल हांगे, ॲड. नितीन दहिवडे, ॲड. विष्णू कापसे, ॲड.रणजित माने, ॲड.नानासाहेब कलढोणे, ॲड.प्रविण खासबागे, ॲड. मिलींद शहा,ॲड.बाळासाहेब खांडेकर, ॲड.महेंद्र ठेंगील, ॲड. सदानंद ठेंगील,ॲड. अनिल सरतापे,ॲड.विजय मगर, ॲड.संतोष सावंत,ॲड. कोकरे,ॲड.सचिन जाधव, ॲड .जानकर,.ॲड.सारिका कापसे, ॲड.स्वाती कवितके आदी उपस्थित होते.
म्हसवड वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,भाजपाचे शिवाजीराव शिंदे,म्हसवड पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा,नितीन दोशी आदींनी अभिनंदन केले.



