प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात

333

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7775096293

 सोलापूर(दि.21जुलै):- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्हा स्तरीय समितीने शिफारस केलेल्या उद्योजकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमास चिंतामणी फाउंडेशन, टेंभुर्णी येथे प्रारंभ झाला. या प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या राज्य नोडल यंत्रणा PMFME आणि राज्यस्तरीय तांत्रिक संस्था कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या तीन दिवसीय प्रशिक्षणात उद्योजकता विकास, अन्न प्रक्रिया उद्योगाचे तांत्रिक पैलू, बँकिंग प्रक्रिया, विक्री व्यवस्थापन, आवश्यक परवाने व व्यवस्थापन कौशल्ये यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शकांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये **श्री. यशवंत हांडे (उद्योजक अभियंता), श्री. अविनाश चंदन (तालुका कृषी अधिकारी), श्री. संजय पाटील (मंडळ कृषी अधिकारी), श्री. नामदेव चिंतामण (सह्याद्री उद्योग समूह), श्री. वाय. जी. भोसले (कृषी तज्ज्ञ), श्री. समाधान खुपसे (समन्वयक, राज्यस्तरीय तांत्रिक संस्था, केव्हीके बारामती), श्री. अमर देशमाने (केव्हीके बारामती), श्री. सचिन खुळे (SK Banana), श्री. शुभम जगताप (AXIS बँक), श्री. मनोज बोबडे (DRP), श्री. रोहित दुपाडे (DRP), पत्रकार श्री. धनंजय मोरे (पुण्यनगरी) व श्री. सदाशिव पवार (सकाळ) आणि श्री. सतीश थोरात (सावन अ‍ॅग्रो) यांचा समावेश होता.

श्री. वाय. जी. भोसले व श्री. समाधान खुपसे यांनी योजनेचे प्रास्ताविक करून PMFME योजनेची सविस्तर माहिती दिली. श्री. अविनाश चंदन यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत उद्योजकांनी त्या अधिकाधिक प्रमाणात स्वीकाराव्यात असे आवाहन केले.

श्री. यशवंत हांडे यांनी उद्योजकता विकास व केस स्टडी द्वारे प्रेरणादायी माहिती दिली. श्री. सचिन खुळे यांनी विक्री व्यवस्थापन यावर प्रभावी मार्गदर्शन केले, तर श्री. संजय पाटील यांनी व्यवसायासाठी आवश्यक परवाने यावर सविस्तर माहिती दिली.

श्री. नामदेव चिंतामणी व श्री. सतीश थोरात यांनी उद्योजक व्यवस्थापन कौशल्ये कशी विकसित करावीत यावर अनुभवाधारित मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ५५ नवीन व कार्यरत उद्योजकांचा सहभाग असून प्रशिक्षणाची पुढील दोन दिवस सत्रे विविध विषयांवर भर देणार आहेत.