

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.21जुलै):-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल समाज माध्यमावर बदनामीकारक अपशब्द लिहिल्यामुळे गंगाखेड येथील आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळासह समाज बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे अपशब्द लिहिणाऱ्या समाजकंटकावर मोक्का कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी मित्र मंडळाच्या वतीने (दिनांक २१ जुलै सोमवार) रोजी गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी आदित्य लोणीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुनील उभे नामक व्यक्तींने आपल्या मोबाईल नंबर वरून समाज माध्यमावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल बदनामीकारक अपशब्द लिहिले या घटनेमुळे राज्यातील संपूर्ण बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या अशा समाजकंटकावर मोक्का कायद्यांतर्गत कठोर शासन होणे गरजेचे आहे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत म्हणून शासनाने सुनील उभे या व्यक्तींवर तत्काळ कार्यवाही करून अटक करावी अशी मागणी गंगाखेड येथील आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळासह समस्त बहुजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे,धनगर समाजाचे नेते सुरेश बंडगर,मा.जि.प.सदस्य किसनराव भोसले,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इकबाल चाऊस,नारायणराव कुंडगीर,उपसभापती संभाजी पोले,उद्धवराव शिंदे,रामप्रसाद सातपुते, राजू खान, मा.नगरसेवक ॲड.कलीम शेख बालासाहेब नेमाने,ॲड.मोहन सानप,शिवसेना शहर प्रमूख जितेश गोरे,मा.उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, रामेश्वर अळणुरे,संदीप राठोड, बाळासाहेब कुकडे,ॲड.मिलिंद शिरसागर,विठ्ठल सातपुते,पिराजी कांबळे,रोहित जामगे,प्रभाकर सातपुते, सतीश घोबाळे,अभिजीत चक्के आदींसह मित्र मंडळ व समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत



