पशु उपचार शिबिरात ७६ जनावरांवर उपचार 

75

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.24जुलै):-‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ निमित्त गोरक्षण सभा रहाटे चौक धंतोली व कापसी गोशाळेत मोफत पशु उपचार शिबिरात ७६ जनावरांवर उपचार करण्यात आला.

‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ या निमित्ताने कापसी येथील भारती दीदी गोशाळा व गोरक्षण सभा, रहाटे चौक, धंतोली नागपूर येथे मोफत पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ७६ जनावरांवर उपचार व लसीकरण करण्यात आले.

                                          शिबिरास डॉ. सुबोध नंदागवळी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नागपूर डॉ.अभय भालेराव सहायक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. प्रदीप गावंडे , पशुधन विकास अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशी गोवंशाचे आरोग्य, औषधी मूल्ये व दुग्धोत्पादनातील महत्त्व विशद केले.

कार्यक्रमात डॉ. सुबोध नंदागवळी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशु सर्व चिकित्सालय, नागपूर यांनी नवीन गोवंश (संवर्धन व कल्याण) कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ भालेराव, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, नागपूर, यांनी ग्रामीण भागात गोसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत जनजागृतीचे आवाहन केले.

शिबिरात डॉ. अभिजीत जामकर आणि डॉ. हर्षल रेवतकर, पशु वैद्यकीय अधिकारी तसेच प्रविण कुंभारे सहायक पशुधन विकास अधिकारी राहुल चोपकर, सारंग राऊत पशुधन पर्यवेक्षक ,संकेत बैस परिचर यांनी उपस्थित राहून जनावरांची आरोग्य तपासणी, विविध आजारांवर उपचार, तसेच लसीकरण केले.

या शिबिराला परिसरातील शेतकरी व गोपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिनेशभाई पटेल कापसी व सुधीर कुलकर्णी , धंतोली यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन गोशाळा व्यवस्थापन व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.